महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

मराठी विश्वकोश या सर्व विषय संग्राहक ज्ञानकोशाच्या संपादन व प्रकाशन कार्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळाची स्थापना दि.1.12.1980 रोजी करण्यात आली. विश्वकोश म्हणजे एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर मराठीतील सामान्यातील सामान्य माणसापर्यंत ज्ञान पोहोचविण्यासाठी ग्रंथरुपी चळवळ, विश्वातील सारे शब्द, त्यामागचा इतिहास, भूगोल, तत्वज्ञान, विज्ञान मराठीतून ज्ञानार्थींना मिळावे हा उद्देश आहे. या मंडळातर्फे मराठी भाषेत विश्वकोशांचे संपादन व प्रकाशन कार्य चालू आहे. मंडळाची पुनर्रचना दि. 5 ऑगस्ट, 2015 रोजी करण्यात आली आहे. मंडळाचे प्रशासकीय कार्यालये रविन्द्र नाटय मंदिर इमारत, दुसरा मजला, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आवार, सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई - 400025 येथे असुन विश्वकोशाचे विभागीय कार्यालय सातारा जिल्हयात वाई येथे आहे. मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत 1 ते 20 खंड प्रकाशित झाले आहेत. उर्वरित 4 खंडाचे संपादन-प्रकाशन चालू आहे. मराठी विश्वकोशाचे 1 ते 20 खंड महाजालकावर तसेच छापील स्वरूपात आणि सा. डी., पेनड्राईव्ह या स्वरूपात देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मुलांचा विश्वकोश या योजनेखाली बालविश्वकोश आणि कुमारविश्वकोश प्रत्येकी 12 खंडात तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून कुमारविश्वकोश खंड 2 ते 11 चे संपादन-प्रकाशन करण्याचे काम प्राधान्याने सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळाची अधिक माहिती http://www.vishwakosh.org.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
एकूण अभ्यागतांची संख्या : १३५७८३, आजचे अभ्यागत : १
Valid XHTML 1.0 Transitional Valid CSS!