नागरिकांची सनद

प्रस्तावना

मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये "मराठी भाषा विभाग" असा स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करण्याचा निर्णय दि.24 जून, 2010च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करण्यात आली असून, नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विभागामध्ये महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या अनुसूचीमधील सामान्य प्रशासन‍ विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अखत्यारितील मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ इ.कार्यालये/संस्था/मंडळ मराठी भाषा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर निर्णयास अनुलक्षून स्वतंत्र मराठी भाषा विभागाच्या स्थापनेबाबतचे आदेश शासन निर्णय, सा.प्र.विभाग क्र.मभावा-2010/458/प्र.क्र.95(भाग-2)/20-ब, दि.22 जुलै, 2010 अन्वये निर्गमित करण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना दि.29 नोव्हेंबर, 2010 रोजी निर्गमित करण्यात आली आहे. नवनिर्मित मराठी भाषा विभाग लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टिने मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती शासन निर्णय सा.प्र.वि.क्र.शप्रस-2010/प्र.क्र.116/20-ब, दि.14 जुलै, 2010 व दि.10 ऑगस्ट, 2010 अन्वये स्थापन करण्यात आली आहे.

मराठी भाषा विभागाची रचना

मा.मंत्री हे मराठी भाषा विभागाचे प्रभारी मंत्री आहेत. विभागासाठी सचिव (मराठी भाषा) हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत. या प्रशासकीय अधिका-यांकडे वर्ग -1 चे अधिकारी व वर्ग -2 चे 8 अधिकारी असून, एकूण 8 कार्यासनांमध्ये या विभागाकडील सर्व विषयांची विभागणी करण्यात आली आहे. (परिशिष्ट-1 सोबत जोडले आहे) तसेच विभागाचा संरचना तक्ता सोबत जोडला आहे. नवनिर्मित मराठी भाषा विभागामध्ये खालील विषयांचे कामकाज हाताळण्यात येते :-
1) मराठी भाषा विभाग (खुद्द) शी संबंधित तसेच मराठी भाषेच्या विकासासंबंधी शासनस्तरावरील सर्व कामे.
2) भाषा संचालनालय व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
3) राज्य मराठी विकास संस्था व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
4) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
5) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
6) पाठयपुस्तके सोडून मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी कला या सर्व विषयांशी संबंधित उत्तम पुस्तकांना उत्तेजन देण्याकरिता पुस्तक निवड करणेबाबत. (पुस्तक निवड समिती) व अनुषंगिक बाबी.

कार्यपूर्तीचे वेळापत्रक

मराठी भाषा विभागामार्फत पुरविण्यात येणा-या सेवांच्या कार्यपूर्तीची वेळापत्रक परिशिष्ट-2 येथे सादर करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रशासकीय कर्मचा-यांचे बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम,2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम 11 मध्ये नमूद केलेल्या न्यायप्रविष्ट बाबी, लोक आयुक्त किंवा उप लोक आयुक्त आणि अन्य घटनात्मक संस्था, आयोग, न्यायिकवत बाबी, केंद्र किंवा अन्य राज्य शासनांच्या संबंधातील प्रकरणे , विधी विधानांची संबंधातील प्रकरणे, विधि विधानांशी संबंधित बाबी, मंत्रिमंडळास सादर होणा-या मुख्य धोरणात्मक बाबी इत्यादींना कार्यपूर्तीच्या स्तंभ क्र.3 येथील वेळापत्रकातून सूट राहील.

नियम / शासन निर्णय

या विभागाशी संबंधित नियम अथवा महत्वाचे शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या विभागाकडून वेळोवेळी निर्गमित होणा-या नियम तथा शासन निर्णयाबाबातची माहिती www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर अद्ययावत करण्यात येते.

गाऱ्हाणी / तक्रारी यांचे निराकरण

कार्यपूर्तीस होणारा विलंब वा अन्य काही गा-हाणी असल्यास त्यासंबंधी परिच्छेद-3 मध्ये नमूद केलेल्या अधिका-यांकडे तक्रार नोंदविता येईल व तक्रार प्राप्त झाल्यापासून 7 दिवसांत त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित अधिका-यांची राहील. यानंतरही नागरिकांचे समाधान न झाल्यास संबंधित सचिवांकडे याबाबत त्यांना तक्रार करता येईल. गा-हाणी समक्ष भेटीत /पत्राने तथा ई-मेलव्दारेही माडंता येतील.

नागरिकांच्या सनदेचा आढावा / सिंहावलोकन :

या नागरिकांच्या सनदेच्या उपयुक्ततेबाबत तथा परिमाणकारकतेचा आढावा मराठी भाषा विभागाकडून दरवर्षी घेण्यात येईल व त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील.

जनसामान्यांकडून सूचना :

ही नागरिकांची सनद सर्वसामान्य मागरिकांच्या छाननीसाठी नेहमीच खुली असेल व सन्माननीय नागरिकांच्या बहुमूल्य सूचनांचा गांभीर्यपूर्वक विचार करुन त्यात वेळोवेळी सुधारणा घडवून आणता येतील. मराठी भाषा विभागाच्या अधिनस्थ्ां येणा-या सेवा उपभोगणा-या नागरिकांना आपले हक्क मांडण्यासाठी सनद नेहमीच सहकार्य करेल.

नागरिकांच्या सनदेची अंमलबजावणी

मराठी भाषा विभाग नागरिकांच्या या सनदेची अंमलबजावणी करण्यास कटिबध्द आहे. मराठी भाषा विभाग आपल्या अधिपत्याखालील सेवा कर्तव्यभावनेने व कार्यतत्परतेने उपल्ब्ध करुन देण्याची हमी देत आहे. या सेवा पुरविताना नागरिकांना सौजन्यापूर्ण वागणूक देण्यारची जबाबदारी विभागातील प्रत्येक अधिकारी/कर्मचा-याची राहील.

विभागाची संरचना

 मराठी भाषा विभागाची संरचना

परिशिष्ट-१

कार्यासन निहाय विषय वाटप

मराठी भाषा विभाग

सचिव

उप सचिव

अवर सचिव

कक्ष अधिकारी

सचिव मराठी भाषा विभाग( अतिरिक्त कार्यभार) 8 मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक (022) 22027649(022)22794167 फॅक्स -(022) 22836877

उप सचिव कार्यासन आस्थापना-1 आस्थापना-2 अर्थसंकल्प शाखा

नोंदणीशाखा

भाषा-1, भाषा-2

भाषा-3 रोखशाखा) 8 मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक (022) 22027649(022)22794167फॅक्स -(022) 22836877

अवर सचिव (गृहव्यवस्थापक)

कार्यासन

आस्थापना-1

अर्थसंकल्प

नोंदणीशाखा

8 मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक

(022) 22794164

फॅक्स -(022) 22836877

कक्ष अधिकारी कार्यासन

आस्थापना-1

8 मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक (022) 22794170

फॅक्स- (022) 22836877

कक्ष अधिकारी

कार्यासन

अर्थसंकल्प

8 मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक

(022) 22794168

फॅक्स -(022) 22836877

कक्ष अधिकारी

कार्यासन

नोंदणीशाखा

8 मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक

(022) 22794169

फॅक्स -(022) 22836877

अवर सचिव

आस्थापना

कार्यासन

आस्था-2

भाषा-1

रोखशाखा

8 मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक (022) 22852298 (022) फॅक्स -(022) 22836877

कक्ष अधिकारी

कार्यासन आस्थापना-2

8 मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक

(022) 22794168

फॅक्स -(022) 22836877

कार्यासन

भाषा-1

8 मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक

(022) 22851639

(022 22794165

फॅक्स -(022) 22836877

कक्ष अधिकारी

कार्यासन

रोखशाखा

8 मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक (022) 22794168फॅक्स -(022) 22836877

अवर सचिव

कार्यासन

भाषा-2,

भाषा-3,

8 मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक (022) 22852298 (022) फॅक्स -(022) 22836877

कक्ष अधिकारी

कार्यासन

भाषा-2

8 मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक

(022) 22794168

फॅक्स -(022) 22836877

कक्ष अधिकारी

कार्यासन

भाषा-3

8 मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक

(022) 22794169

फॅक्स -(022) 22836877

परिशिष्ट-२

कार्यपूर्तीचे वेळापत्रक

कार्यासन क्रमांक

विभगाकडून/कार्यालयाकडून

पुरविली जाणारी सेवा

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालवधीत सेवा पुरविली जाते.

सेवा पुरविणारा अधिकारी/कर्मचारी (दालन क्रमांक व दूरध्वनी विस्तार क्रमांक)

सेवा‍ विहीत कलावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी व त्यांचा दूरध्वनी क्रमांक

1

2

3

4

5

आस्थापना-1

· मराठी भाषा विभागाच्या आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबी.

·गोपनीय अभिलेख ठेवणे

· गोपनीय अहवालाची प्रत संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना देणे व गोपनीय अहवाल जतन करणे.

 • गोपनीय अहवालाची प्रतिकूल शेऱ्यावरील अभिवेदनावरील कार्यवाही.
 • अग्रिम मंजूर करणे (घरबांधणी/भविष्य निर्वाह‍ निधी/मोटार/मोटार सायकल/संगणक इ.
 • विभागात नवीन पदे निर्माण करणे / अस्थायी पदे पुढे चालू ठेवणे, स्थायीकरणाचे प्रस्ताव सादर करणे.
 • ठेव संलग्न विमा योजना
 • विभागातील अधिकारी /कर्मचारी यांना ओळखपत्र देणे तसेच शासकीय कामानिमित्त खाजगी व्यक्तींना तात्पुरते मंत्रालय प्रवेशपत्र देणे.
 • मराठी भाषा विभागातील अधिकारी / कार्यासने यांनी शासकीय कामकाजासंबंधात केलेल्या खर्चाची - शासकीय परिवहन सेवा/मंत्रालय उपहारगृह/इंधन/किरकोळ खर्चाची प्रतिपूर्ती /टॅक्सी प्रवास खर्च/भविष्यनिर्वाह निधी खातेपत्रकासाठी पूर्वमुद्रित कागदाची खरेदी इ.संदर्भातील देयके अदा करणे.
 • विभागातील अधिकाऱ्यांना वृत्तपत्रे, नियतकालिके व प्रकाशने पुरविण्याबाबत.
 • विभागाचे संकेतस्थळ
 • ई-गव्हर्नन्स.
 • मराठी भाषा विभागाची विषयसूची तयार करणे.
 • गट अ, गट ब, गट ब (अराजपत्रित), गट क व गट ड संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांच्या पदस्थापना व अंतर्गत बदल्या.
 • गट क व गट ड अनुकंपा तत्वावरील नियुक्ती संबंधातील प्रकरणे/ अनुकंपा यादी ठेवणे
 • गट क (वाहनचालक) व गट ड मधील पदांवर सरळसेवेने भरती
 • चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या पदोन्नती संबंधातील बाबी.
 • सेवांतर्गत आश्वासन प्रगती योजनेनुसार वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी मंजूर करणे
 • विभागीय परीक्षा, एतदर्थ मराठी मंडळाची मराठी/हिंदी भाषा परीक्षा, संगणक अर्हता परीक्षा प्रमाणपत्र सादर करण्यातून सूट देणे/वेतनवाढ रोखणे/मुक्त करणे
 • नामनिर्देशित गट अ ते गट ड संवर्गातील पदावर नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची पूर्व चारित्र पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी, खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवार उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र, अपंग उमेदवारांचे अपंगत्वाबाबतचे प्रमाणपत्र इ. बाबतची कार्यवाही करणे.
 • अवैध जात प्रमाणपत्र / जाती प्रमाण पत्रासंदर्भात कार्यवाही
 • विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची अन्य शासकीय कार्यालयात व मंत्री आस्थापनेवरील प्रतिनियुक्ती व प्रत्यावर्तन
 • विभागातील अधिकारी/कर्मचा-यांची विभागीय चौकशी / निलंबन प्रकरणे
 • अधिकारी/कर्मचारी यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीस मंजूरी देणे / राजीनामा मंजूरीबाबत निर्णयाबाबतची कार्यवाही
 • अधिकारी/कर्मचारी यांची सेवानिवृत्ती व तद्नुषंगिक बाबी.
 • अधिकारी/कर्मचारी यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची प्रकरणे / वैद्यकिय सवलतीची प्रकरणे
 • गट अ व गट ब गट क व गट ड संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांची 30 वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर किंवा वयाच्या 50/55 व्या वर्षानंतर शासन सेवेत राहण्याची पात्रता आजमावणे. मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या नोटीसी विरूध्द सादर केलेल्या अभिवेदनावर कार्यवाही करणे
 • गोपनिय अहवालातील प्रतिकूल शे-यावरील अभिवेदनावर निर्णय घेणे - गट अ राजपत्रित अधिकारी, गट ब राजपत्रित अधिकारी, गट ब (अराजपत्रित) आणि गट क व गट ड मधील कर्मचारी
 • अधिकारी / कर्मचारी यांचे देशांतर्गत वा विदेशी प्रशिक्षण
 • विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना पारपत्र व व्हिसा या करीता ना-हरकत प्रमाणपत्र देणे
 • नागपूर अधिवेशनासाठी अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध करून देणे
 • आगावू वेतनवाढी मंजूर करणे/आस्थापना मंडळाकडे शिफारस करण्यासाठी उप सचिव, अवर सचिव, वरिष्ठ स्वीय सहायक, कक्ष अधिकारी व निवडश्रेणी लघुलेखक यांची माहिती सा. प्र. विभागास कळविणे
 • गट ब (अराजपत्रित) आणि गट क व गट ड मधील कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढ मंजूर करणे / आस्थापना मंडळाकडे शिफारस करणे
 • सेवाप्रवेशोत्तर परीक्षा / विभागीय परीक्षेसाठी अधिकारी /कर्मचारी यांची शिफासर करणे
 • सा. प्र. वि. कार्यासन-14, 14-अ, 14-ब च्या आदेशानुसार तदर्थ पदोन्नतीस मुदतवाढ देणे
 • सर्व संवर्गातील वेतन निश्चितीबाबतची प्रकरणे
 • सेवेतील खंड क्षमापित करणे/सेवा जोडून देणे
 • स्थानिक लाभ प्रमाणपत्र (स्थायीत्व प्रमाणपत्र) देण्याच्या अटी व शर्थींची पूर्तता करणा-यांना मंजूरी देणे.
 • अधिकारी/कर्मचारी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविणे विशेष वेतनास मंजूरी देणे
 • संबंधित प्राधिकाऱ्‍यांच्या पूर्व मंजूरीच्या शिफारशी प्रमाणे रजा मंजूरीबाबत
 • स्वग्राम /रजा प्रवास सवलत मंजूरी, स्वग्राम घोषित करणे
 • विशेष असाधारण रजा/असाधारण रजा मंजूर करणे
 • सेवानिवृत्तीच्या दिवशी शिल्लक असलेल्या रजेच्या रोखीकरणास परवानगी देणे
 • मंत्रालय नियंत्रण कक्ष, स्पर्धा परीक्षा, निवडणूका इत्यादीसाठी अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध करून देणे.
 • सह सचिव, उप सचिव, वरिष्ठ स्वीय सहायक, कक्ष अधिकारी व निवडश्रेणी लघुलेखक, सहायक, उच्च/निम्म श्रेणी लघुलेखक, लिपिक/टंकलेखक यांची ज्येष्ठतासूची तयार करण्यासाठी तसेच निवडसूची तयार करण्यासाठी माहिती सा. प्र. विभागास पाठविणे
 • वाहन चालक, शिपाई/नाईक/हवालदार यांची ज्येष्ठतासूची व निवडसूची तयार करणे
 • जन्मतारखेच्या नोंदी संदर्भात कार्यवाही.
 • मानिव दिनांकाबाबतची प्रकरणे
 • राज्य गट विमा योजनेचा सभासद करून घेणे
 • शासकीय कर्मचा-यास सेवानिवृत्तीनंतर शासन सेवेत पुनर्नियुक्ती देणे/करार पध्दतीने नेमणूका देणे
 • विहित कामासाठी करारपध्दतीने नियुक्ती करणेबाबत.
 • सेवानिवृत्तीनंतर नोकरी/धंदा करण्यास परावानगी देणे
 • अधिकारी/कर्मचारी यांना शासकीय निवासी जागा मिळणेबाबतची प्रकरणे
 • कार्यासनाशी संबंधीत विषयाबाबतचे विधीमंडळ कामकाज
 • कार्यासनाशी संबंधीत विषयाबाबतचे न्यायालयीन कामकाज
 • कार्यासनाशी संबंधीत विषयानुसार माहिती अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त झालल अर्ज व अपील अर्ज यावरील कार्यवाही करणे.
 • सामान्य प्रशासन विभागास आस्थापना विषयक मासिक/त्रैमासिक/सहामाही/वार्षिक अहवाल सादर करणे. (रिक्त पदे, सामाजिक आरक्षण, अनुशेष इ. तसेच याबाबतचे समन्वय करणे)
 • नागरीकांची सनद
 • आहरण व नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करणे.
 • मत्ता व दायित्व विवरणपत्र
 • माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत राज्य माहिती आयुक्त यांना मासिक/वार्षिक अहवाल सादर करणे.

KRA विषयक माहिती सादर करणे.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियिमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम10(1) मधील तरतुदीस अनुसरुन, तात्काळ नस्ती शक्यतो त्याच दिवशी आणि तातडीच्या स्वरुपाची नस्ती शक्यतो 4 दिवसात निकाली काढण्यात येईल. अन्य विभागाशी संबंधित नसलेल्या नस्तीवर 45 दिवसाच्या आत वदुसऱ्या विभागाशी बाब अंतर्भूत असलेल्या नस्तीवर 3 महिन्याच्या आत निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल.

कक्ष अधिकारी

,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन भवन,

मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई

(022)22794170

अवर सचिव,

, मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन

भवन,

मादाम कामा रोड,

मंत्रालय, मुंबई

(022)22855164

उप सचिव,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन भवन,

मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई

(022)22027649

आस्थापना-2

 • मराठी भाषा विभागातील अधिकारी / कर्मचारी यांची वेतन देयके आहरण व संवितरण
 • देयकांच्या अनुषंगाने आवश्यक त्या हिशोबांच्या नोंदवहया ठेवणे.
 • सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे
 • मराठी भाषा विभाग (खुद्द) खर्चाचा ताळमेळ घालणे.
 • गट ड कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे लेखे ठेवणे.
 • लेखापरीक्षणाबाबतची सर्व प्रकारची कामे.
 • कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील यांचेकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना लागू करणे.
 • मा. उपलोकायुक्त यांच्या डिजिटल सेवापुस्तक संकल्पना राबविण्यासंदर्भातील निदेशानुसार सामान्य प्रशासन विभाग तसेच वित्त विभाग यांच्या पत्रात नमूद केल्यानुसार या विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचे डिजिटल सेवापुस्तक तयार करणे
 • अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनातून विहित वेळेत आयकर कपात करुन भरणा करणे.

जाहिरात व प्रसिद्धी याबाबतचे समन्वय करणे.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियिमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम10(1) मधील तरतुदीस अनुसरुन, तात्काळ नस्ती शक्यतो त्याच दिवशी आणि तातडीच्या स्वरुपाची नस्ती शक्यतो 4 दिवसात निकाली काढण्यात येईल. अन्य विभागाशी संबंधित नसलेल्या नस्तीवर 45 दिवसाच्या आत वदुसऱ्या विभागाशी बाब अंतर्भूत असलेल्या नस्तीवर 3 महिन्याच्या आत निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल.

कक्ष अधिकारी

,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन भवन,

मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई

(022)22794168

अवर सचिव,

, मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन

भवन,

मादाम कामा रोड,

मंत्रालय, मुंबई

(022)22855139

उप सचिव,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन भवन,

मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई

(022)22027649

अर्थसंकल्प

 • विभाग (खुद्द) व विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांचे अर्थसंकल्पीय अंदाज (सुधारित अंदाजासह) व तद्नुषंगिक इतर सर्व बाबी तसेच या संबंधीचे समन्वय करणे.
 • कार्यक्रम अंदाजपत्रक तयार करणे
 • लोकलेखा समिती संबंधीचे कामकाज
 • महालेखापालांकडून राज्य विधान मंडळास सादर करण्यात येणाऱ्या सर्व अहवालांचे समन्वयन.
 • प्रलंबित निरीक्षण अहवाल / परिच्छेद
 • सेवार्थ विषयक समन्वयाचे कामकाज
 • अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीचे काम (BDS) तसेच नियोजन विभागाच्या योजना माहिती प्रणालीचे काम (State Data Bank)
 • राज्यपाल / वित्त मंत्री यांचे अभिभाषण
 • विभागातील नियंत्रक अधिकारी यांची यादी तयार करणे व अद्ययावत ठेवणे.
 • कपात सूचनांचे समन्वय
 • शासकीय कर्मचारी इत्यादिंना कर्ज फक्त निधीची उपलब्धता करुन देणे व त्याचे वाटप करणे.
 • खर्चमेळ्याचे समन्वय करणे.
 • विभागातील व विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालय / विभाग प्रमुखांचे वित्तीय व प्रशासकीय अधिकार प्रदानाचे प्रस्ताव तपासून मान्यता देणे.
 • “शासकीय वाहनांसंदर्भातील बाबी” यामध्ये पुढील बाबींचा समावेश होईल.

अ) वाहन खरेदी व जुन्या वाहनांचे निर्लेखन.

आ) वाहनांसाठी इंधन, तेल व वंगण इत्यादीचा पुरवठा.

इ) वाहनांची नियमित देखभाल-दुरूस्ती व त्यासंबंधीची देयके.

ई) लॉगबूकचे नियंत्रण करणे.

उ) वाहन चालकांना अतिकालिक भत्ता मंजूर करणे.

ऊ) वाहन चालकांचे गणवेष.

ए) वाहन चालकांच्या रजेची शिफारस करणे.

ऐ) वाहन चालकांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदन / पुनर्विलोकन करुन आस्थापना -1 कार्यासनाकडे संस्करणासाठी पाठविणे.

ओ) वाहनांचे इतिहास पुस्तक अद्ययावत ठेवणे

वाहनांचे बदललेल्या सुट्या भागांच्या नोंदी व निर्लेखनाची कार्यवाही

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियिमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम10(1) मधील तरतुदीस अनुसरुन, तात्काळ नस्ती शक्यतो त्याच दिवशी आणि तातडीच्या स्वरुपाची नस्ती शक्यतो 4 दिवसात निकाली काढण्यात येईल. अन्य विभागाशी संबंधित नसलेल्या नस्तीवर 45 दिवसाच्या आत वदुसऱ्या विभागाशी बाब अंतर्भूत असलेल्या नस्तीवर 3 महिन्याच्या आत निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल.

कक्ष अधिकारी

,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन भवन,

मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई

(022)22794168

अवर सचिव,

, मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन

भवन,

मादाम कामा रोड,

मंत्रालय, मुंबई

(022)22855164

उप सचिव,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन भवन,

मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई

(022)22027694

नोंदणीशाखा

 • मराठी भाषा विभागात आलेले टपाल/नस्त्या (गोपनीयसह) स्वीकारणे. त्याचा कार्यासन निहाय बटवडा करणे तसेच टपाल / नस्त्या पाठविणे.
 • फ्रॅकिंग मशीनची देखभाल व सुव्यवस्थित चालविण्यासाठी सेवा निविदा करार करणे.
 • फ्रॅकिंग मशीन करीता लागणारे डाक मुद्रांक शुल्क भरण्याबाबतची कार्यवाही करणे तसेच त्याचा हिशोब ठेवणे.
 • मराठी भाषा विभागातील अभिलेख जतन करणे.
 • क्षेत्रीय कार्यालयांनी प्रकाशित केलेली पुस्तके उपलब्ध करुन घेणे.
 • मंत्रालयीन विभाग व अन्य शासकीय कार्यालये यांच्याकडील संदर्भ पुस्तके / मासिके उपलब्ध करुन घेणे.
 • मराठी भाषा विभागाचे ग्रंथालय – शासकीय मुद्रणालयांकडून पुरविण्यात येणारी पुस्तके, क्षेत्रीय कार्यालयांकडून प्रकाशित करण्यात येणारी पुस्तके, शासनाच्या अन्य विभागाकडून पुरविण्यात येणारी पुस्तके व इतर संदर्भ पुस्तके / मासिके तसेच विभागाकडून खरेदी करण्यात येणारी पुस्तके, संदर्भ ग्रंथ, विभागांतर्गत गठीत केलेल्या समित्यांचे अहवाल यांचे जतन / व्यवस्थापन करणे.
 • संदर्भ ग्रंथ, पुस्तके, मासिके यांची खरेदी करणे.
 • विभागातील परीक्षार्थी अधिकारी व कर्मचारी यांना पुस्तके / टिपण्या इ. पुरविणे.
 • सारसंग्रह पुस्तक तयार करणे.
 • शासकीय मुद्रणालयाकडून लेखन सामग्री व साधनसामग्री, वस्तूंची मागणी करणे तसेच खाजगी पुरवठादारांकडून लेखन सामग्री , वस्तूंची खरेदी करणे, त्याची जड वस्तू संग्रह नोंदवहीत नोंद ठेवणे, अधिकारी व कार्यासनांना वाटप करणे.
 • विभागातील यंत्र सामग्रीची दुरुस्ती करणे, सेवाकरार / दर करार करणे.
 • झेरॉक्स व चक्रमुद्रित प्रती काढण्याची व्यवस्था करणे.
 • नवीन फर्निचर (लाकडी व लोखंडी) बनवून घेणे व जुन्या फर्निचरची दुरुस्ती करणे.
 • नवीन दूरध्वनी जोडण्या घेणे व दूरध्वनी देयके तसेच अधिकारी यांना पुरविण्यात येणाऱ्या भ्रमणध्वनी संबंधीच्या सर्व बाबी.
 • विभागांतर्गत शासकीय मालमत्तेचे व संयत्रणांचे व्यवस्थापन व देखभाल
 • साधन सामग्रींचे निर्लेखन करणे.
 • विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना गणवेश उपलब्ध करुन देणे.
 • विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर थांबल्याबद्दल अतिकालिक भत्ता मंजूर करणे.
 • कार्यरत शिपाई यांना कामाचे वाटप आणि बंदपाळीची व्यवस्था करणे.
 • शिपाई यांच्या रजेबाबत शिफारस करणे.
 • शिपाई यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व संस्करणासाठी आस्थापना-1 शाखेकडे पाठविणे.
 • विधानमंडळ कामकाजाशी संबंधित मराठी भाषा विभागातील समन्वयाची कामे.
 • नागपूर अधिवेशनासंबंधातील व्यवस्था तसेच अधिवेशन कालावधीतील रेल्वे व विमानासाठी प्राथम्यपत्र देणे.
 • विभागाचा थकीत प्रकरणांचा अहवाल तयार करणे व सामान्य प्रशासन विभागास पाठविणे.

विभागांतर्गत एकापेक्षा अनेक कार्यासनांशी संबंधित कामकाजाचे समन्वय.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियिमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम10(1) मधील तरतुदीस अनुसरुन, तात्काळ नस्ती शक्यतो त्याच दिवशी आणि तातडीच्या स्वरुपाची नस्ती शक्यतो 4 दिवसात निकाली काढण्यात येईल. अन्य विभागाशी संबंधित नसलेल्या नस्तीवर 45 दिवसाच्या आत वदुसऱ्या विभागाशी बाब अंतर्भूत असलेल्या नस्तीवर 3 महिन्याच्या आत निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल.

कक्ष अधिकारी

,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन भवन,

मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई

(022)22794169

अवर सचिव,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन

भवन,

मादाम कामा रोड,

मंत्रालय, मुंबई

(022)22794164

उप सचिव,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन भवन,

मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई

(022)22027694

भाषा-1

 • मराठी भाषा विभागांतर्गत गठीत करण्यात आलेल्या / येणाऱ्या सर्व समित्यांचे कामकाज.
 • मराठी भाषा विभागाच्या नियंत्रणाखालील संस्था / मंडळ/ कार्यालयातील गठीत करण्यात आलेल्या / येणाऱ्या समित्यांचे शासन स्तरावरील कामकाज
 • अभिजात भाषाविषयक कामकाज
 • मराठी भाषा धोरण‍ विषयक कामकाज.
 • मराठी भाषा विभागांतर्गत नव्याने गठीत करण्यात आलेल्या / येणाऱ्या सर्व समित्यांचे शासन स्तरावरील कामकाज.
 • भाषा संचालनालयांतर्गत अस्तित्वात असलेल्या भाषा सल्लागार समिती तसेच विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती या दोन समित्यांबाबतचे शासन स्तरावरील कामकाज.
 • मराठी भाषा विभागांतर्गत नव्याने गठीत करण्यात आलेल्या अभिजात मराठी भाषा समितीचे शासनस्तरावरील कामकाज. (बैठका आयोजित करणे, केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार करणे, पाठपुरावा करणे इ. प्रवासभत्ता / दैनिकभत्ता खर्चाची प्रतिपूर्ती करणे)
 • भाषा सल्लागार समितीने तयार केलेल्या “महाराष्ट्र राज्याचे पुढील 25 वर्षासाठीचे मराठी भाषा विषयक धोरण – 2014 (मसुदा) ” अंतिम करणेकरिता शासन स्तरावरील कामकाज.
 • अभिजात भाषा समिती, भाषा सल्लागार समिती व विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती यांचेबाबत माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत व इतर मान्यवरांकडून प्राप्त होणाऱ्या पत्रव्यवहारावर कार्यवाही करणे.
 • अभिजात भाषा समितीच्या बैठकांचे आ योजन करणे व बैठकीवरील खर्चाची प्रतिपूर्ती करणे.
 • भाषा सल्लागार समितीच्या बैठकीत जे ठरावर पारित केले जातात त्याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणे.

योजना विषयक समन्वय उदा. मुख्यमंत्री / मुख्य सचिव / कार्यालयांना विभागाच्या योजनांची माहिती देणे, संकलित माहितीचे वेळोवेळी अद्ययावतीकरण करणे Vision Document) तयार करणे इत्यादी.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियिमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम10(1) मधील तरतुदीस अनुसरुन, तात्काळ नस्ती शक्यतो त्याच दिवशी आणि तातडीच्या स्वरुपाची नस्ती शक्यतो 4 दिवसात निकाली काढण्यात येईल. अन्य विभागाशी संबंधित नसलेल्या नस्तीवर 45 दिवसाच्या आत वदुसऱ्या विभागाशी बाब अंतर्भूत असलेल्या नस्तीवर 3 महिन्याच्या आत निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल.

कक्ष अधिकारी

,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन भवन,

मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई

(022)22794169

अवर सचिव,

, मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन

भवन,

मादाम कामा रोड,

मंत्रालय, मुंबई

(022)22852298

उप सचिव,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन भवन,

मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई

(022)22027649

भाषा-2

 • शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करणे संदर्भात अधिसूचना, शासन निर्णय, परिपत्रक इ. निर्गमित करणेबाबत.
 • शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करणेसंदर्भात मा.विधानसभा/विधानपरिषद सदस्य तसेच इतर मान्यवराकडून प्राप्त होणा-या पत्रांवर कार्यवाही करणे.
 • केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याबाबत.
 • “शासन व्यवहारात मराठीचा वापर” या धोरणात्मक बाबीसंदर्भात मंत्रालयीन विभागाकडून प्राप्त एतदर्थ मंडळाची मराठी व हिंदी भाषा परीक्षा उतीर्ण होणे, सूट देणे इत्यादीबाबतचे अनौपचारीक संदर्भावर कार्यवाही करणे.
 • शासन सेवेतील इंग्रजी लघुलेखक/टंकलेखक/लिपिक-टंकलेखक यांना एतदर्थ मंडळाची मराठी लघुलेखन/टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होणे/सूट देणे यासंदर्भातील प्रकरणे
 • भाषा भवन – “ मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्र” या इमारतीच्या बांधकामाबाबत.
 • दि.1 ते 15 मे या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणे.
 • शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करण्याच्या अनुषंगाने स्थापन केलेल्या एतदर्थ मंडळास मुदतवाढ देणे, मंडळाची पुनर्रचना करणे, सदस्यांना मानधन देणे इत्यादी प्रस्तावांच्या अनुषंगाने कार्यवाही करण
 • परिभाषा कोशाचा वापर तसेच त्यांच्या मुद्रण व पुर्नमुद्रणास मान्यता देणे
 • भारताचे संविधानाची मराठी आवृत्ती तसेच डिग्लॉट आवृत्ती(मराठी-इंग्रजी) च्या प्रतीच्या खर्चास मान्यता देणे.
 • मराठी/इंग्रजी मजकूराचा अनुवाद करण्यासाठी भाषा संचालनालय कार्यालयात तज्ञांची नामिका स्थापन करण्यास मान्यता देणे.
 • उर्दू मजकूराचा अनुवाद करण्यासाठी तज्ञांची नामिका स्थापन करण्याबाबत
 • अर्थसंकल्पाच्या मराठी अनुवादाचे काम करणा-या अधिकारी/कर्मचारी यांना मिळणाऱ्या मानधनात सुधारणा करणे
 • भाषा संचालनालयाच्या प्रकाशनांचे ई-पुस्तक तयार करण्यास मंजूरी देणे.

· भाषा संचालनालयाचे अर्थसंकल्पीय कामकाजासंदर्भातील कार्यवाही करणे.

 • मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना
 • विश्वकोश खंडाचे संपादन करून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देणेबाबत
 • मुलांचा विश्वकोश या योजनेतील कुमारविश्वकोश व बालविश्वकोश यांचे संपादकीय व प्रशासकीय कामास वित्तीय मंजूरी देणे
 • विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई व शासकीय मुद्रणालय यांच्या संयुक्त इमारतीचे वाई येथे बांधकाम
 • अभ्यागत संपादकांच्या मानधनात वाढ करणे तसेच अभ्यागत संपादकांच्या भेटीची सवलत पुढे चालू ठेवण्याबाबत.
 • विश्वकोश खंडांचे खाजगीरित्या मुद्रण व पुर्नमुद्रण करण्यास मान्यता देणे.
 • विश्वकोशाच्या संपादनाचे काम करणारे लेखक,भाषांतरकार व समीक्षकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत
 • मराठी विश्वकोशाच्या वेबपोर्टलच्या रचनेत बदल करून अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे व तिची कार्यक्षमता सुधारण्याच्या खर्चास शासकीय मंजूरी मिळणेबाबत.
 • विश्वकोश निर्मिती मंडळाचे अर्थसंकल्पीय कामाकाजा संदर्भातील कार्यवाही करणे.
 • भाषा संचालनालय व विश्वकोश निर्मिती मंडळाच्या योजनांना प्रशासकीय / वित्तीय मान्यता देणे.

भाषा संचालनालय व विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयातील कार्यालयीन कामकाज विषयक बाबी.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियिमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम10(1) मधील तरतुदीस अनुसरुन, तात्काळ नस्ती शक्यतो त्याच दिवशी आणि तातडीच्या स्वरुपाची नस्ती शक्यतो 4 दिवसात निकाली काढण्यात येईल. अन्य विभागाशी संबंधित नसलेल्या नस्तीवर 45 दिवसाच्या आत वदुसऱ्या विभागाशी बाब अंतर्भूत असलेल्या नस्तीवर 3 महिन्याच्या आत निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल.

कक्ष अधिकारी

,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन भवन,

मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई

(022)22794170

अवर सचिव,

, मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन

भवन,

मादाम कामा रोड,

मंत्रालय, मुंबई

(022)22852298

उप सचिव,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन भवन,

मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई

(022)22027649

भाषा-3

 • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, 2010 मध्ये अंतर्भूत संबंधित मुद्दयांच्या अनुषंगाने कार्यवाही करणे
 • कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन दि. 27 फेब्रुवारी “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करणे
 • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुर्नरचना करणे (अध्यक्ष, सदस्य - नियुक्ती / राजीनामा)
 • साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या नांवे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करणे
 • साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार प्रदान करणे
 • उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करणे
 • ग्रंथसंस्कृती जोपासना अभियान अंतर्गत सर्व जिल्हयांमध्ये ग्रंथोत्सव आयोजित करणे
 • थोर राष्ट्रपुरुषांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने मराठी भाषा आणि साहित्य विषयक उपक्रम कार्यक्रम राबविणे
 • महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे
 • महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळामार्फत प्रकाशित पुस्तके ई-पुस्तकात रुपांतरीत करुन संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणे
 • साहित्य संमेलनांच्या अनुषंगाने कार्यवाही -

अ) विश्व मराठी साहित्य संमेलनास अनुदान मंजूर करणे

ब) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अनुदान मंजूर करणे

क) अन्य साहित्य संमेलनास अनुदान मंजूर करणे

ड) साहित्य संमेलनांमध्ये पारीत ठरावांच्या अनुषंगाने कार्यवाही करणे

 • बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्य संस्थांना अनुदान मंजूर करणे.
 • महाराष्ट्र्रातील प्रादेशिक साहित्य संस्थांना अनुदान मंजूर करणे.
 • नवलेखक प्रोत्साहन योजना, नियतकालिक अनुदान योजना
 • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष यांना वाहन खरेदीस व वाहन दुरुस्तीस मंजूरी देणे
 • ललित व ललितेतर पुस्तक प्रकाशनार्थ व्यक्ती /संस्थांना अर्थसहाय्य करणे
 • पुस्तक प्रकाशन योजना
 • उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर योजना
 • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना / उपक्रमांना प्रशासकीय / वित्तीय मान्यता देणे
 • महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाशी संबंधित अर्थसंकल्पीय कामकाज (आकस्मिकता निधी अग्रीम, पूरक मागणी, कार्यक्रम अंदाजपत्रक, संक्षिप्त देयके इ.)
 • महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाशी संबंधित संकीर्ण बाबी
 • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, 2010 मध्ये अंतर्भूत राज्य मराठी विकास संस्थेशी संबंधित मुद्दयांच्या अनुषंगाने कार्यवाही करणे
 • राज्य मराठी विकास संस्थेमार्फत प्रकाशित केलेली पुस्तके ई-पुस्तकात रुपांतरीत करुन संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणे
 • थोर राष्ट्रपुरुषांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने मराठी भाषा आणि साहित्य विषयक उपक्रम राबविणे
 • मराठी युनिकोड टंक तयार करुन मुक्तस्त्रोत स्वरुपात उपलब्ध करुन देणे बाबत
 • तंजावूर (तामिळनाडू) येथील मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तऐवजांचे देवनागरीकरण करणे व शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणे
 • राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची पुर्नरचना करणे (अशासकीय सदस्य - नियुक्ती / राजीनामा)
 • संचालक यांना वाहन खरेदीस व वाहन दुरुस्तीस मंजूरी देणे
 • राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळाची पुनर्बांधणी व उन्नतीकरण
 • संकेतस्थळ स्पर्धा आयोजित करणे
 • मुद्रणाधिकार संपलेल्या दुर्मिळ ग्रंथांचे संगणकीकरण करणे
 • नामवंत साहित्यिकांचे साहित्य श्राव्य पुस्तक स्वरुपात संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणे
 • मराठी भाषा विकसित करण्याच्या अनुषंगाने कोश / पुस्तके प्रकाशित करणे (वस्त्रनिर्मिती माहिती कोश, दलित –ग्रामीण साहित्य शब्दकोश, गीतावर्ण संदर्भ कोश, इ.)
 • अमराठी भाषिकांसाठी मराठी प्रशिक्षण आखणे / क्रमिक पुस्तके प्रकाशित करणे
 • विज्ञान विषयक पुस्तकांचे व एन.सी.ई.आर.टी च्या पुस्तकांचे मराठी भाषांतर
 • राज्य मराठी विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्‍या विविध योजना / उपक्रमांना प्रशासकीय / वित्तीय मान्यता देणे

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या कार्यालयांच्या कार्यालयीन कामकाज विषय बाबी.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियिमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम10(1) मधील तरतुदीस अनुसरुन, तात्काळ नस्ती शक्यतो त्याच दिवशी आणि तातडीच्या स्वरुपाची नस्ती शक्यतो 4 दिवसात निकाली काढण्यात येईल. अन्य विभागाशी संबंधित नसलेल्या नस्तीवर 45 दिवसाच्या आत वदुसऱ्या विभागाशी बाब अंतर्भूत असलेल्या नस्तीवर 3 महिन्याच्या आत निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल.

कक्ष अधिकारी

,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन भवन,

मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई

(022)22794169

अवर सचिव,

, मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन

भवन,

मादाम कामा रोड,

मंत्रालय, मुंबई

(022)22852298

उप सचिव,

मराठी भाषा

विभाग,

8 वा मजला,

नवीन प्रशासन भवन,

मादाम कामा रोड

मंत्रालय, मुंबई

(022)22027649

भाषा संचालनालय

शासनाने राज्य कारभाराची भाषा मराठी राहील असे धोरण दि.१ मे,१९६० रोजी जाहीर केले. मराठी राजभाषा धोरणाचा एक भाग म्हणून शासन निर्णय दि.६जुलै, १९६० अन्वये भाषा संचालनालयाची शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे असून, संचालनालयाच्या अधिपत्याखाली नवी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद येथे विभागीय कार्यालये आहेत. भाषा संचालनालयामार्फत खालील कामकाज हाताळण्यात येते:-
 • शासनाचे राजभाषा मराठी विषयक धोरण राबविणे
 • प्रशासनिक परिभाषा कोश व मार्गदर्शकपुस्तिका तयार करणे
 • अमराठी भाषिक अधिकारी/ कर्मचारी यांचेसाठी मराठी भाषा परीक्षा आयोजित करणे. केंद्र / राज्य अधिनियमांचा अनुवाद करणे
 • महाराष्ट्र राज्यातील केंद्र शासनाच्या कार्यालयात त्रिभाषा सुत्राचा वापर होतो किंवा नाही हे पाहणे
 • शासन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करण्यासंबंधीच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने शासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे, जिल्हापरिषदा इ.कार्यालयांची तपासणी करणे व त्यांना मार्गदर्शन करणे इ.
 • भाषा संचालनालयाची अधिक माहिती http://bhasha.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल
 • भाषा सल्लागार समिती

  राज्याचे राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी कायमस्वरुपी भाषा सल्लागार समिती गठीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार निवृत्त न्या.नरेंद्र चपळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली २१ अशासकीय सदस्य व ५ शासकीय सदस्य अशी भाषा सल्लागार समिती, शासन निर्णय दि.२२ जून, २०१० अन्वये गठीत करण्यात आली. तथापि न्या.चपळगांवकर यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून, तो दि.१६ जुलै, २०११ रोजी स्वीकृत करण्यात आला आहे. शासन निर्णय मराठी भाषा विभाग दिनांक ९ एप्रिल २०१२ अन्वये डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

  मराठी विश्वकोश या सर्व विषय संग्राहक ज्ञानकोशाच्या संपादन व प्रकाशन कार्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना दि.१.१२.१९८० रोजी करण्यात आली.विश्वकोश म्हणजे एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर मराठीतील सामान्यातील सामान्य माणसांपर्यंत ज्ञान पोहचविण्यासाठी ग्रंथरुपी चळवळ, विश्वातील सारे शब्द, त्यामागचा इतिहास, भूगोल, तत्वज्ञान, विज्ञान मराठीतून ज्ञानार्थींना मिळावे हा उद्देश आहे. या मंडळातर्फे मराठी भाषेत विश्वकोशांचे संपादन व प्रकाशन कार्य चालू आहे.

  मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती विजया वाड ह्या असून, २२ अशासकीय सदस्य आहेत. मंडळाचे प्रशासकीय कार्यालय रवीन्द्र नाटय मंदिर इमारत, दुसरा मजला, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आवार, सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई-४०००२५ येथे असून, विश्वकोशाचे विभागीय कार्यालय, सातारा जिल्हयात वाई येथे आहे.

  मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत १ ते १९ खंड प्रकाशित झाले आहेत. उर्वरित ४ खंडांचे संपादन-प्रकाशन चालू आहे. मराठी विश्वकोशाचे १ ते १२ खंड महाजालकावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मुलांचा विश्वकोश या योजनेखाली बालविश्वकोश आणि कुमारविश्वकोश प्रत्येकी १२ खंडात तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, कुमारविश्वकोश खंड २ व ११ चे संपादन-प्रकाशन करण्याचे काम प्राधान्याने सुरु करण्यात आले आहे.

  महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची अधिक माहिती http://www.vishwakosh.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. मंडळाचा
  ई-मेल पत्ता vinimaprashasan@yahoo.co.in असा आहे.

  राज्य मराठी विकास संस्था

  मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे, १९९२ रोजी 'राज्य मराठी विकास संस्थेची' स्थापना केली. 'संस्था नोंदणी अधिनियम, १९६०' आणि 'मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०' या अन्वये दिनांक २ जानेवारी, १९९३ रोजी संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे स्वायत्त संस्था म्हणून नोंदणी झाल्यावर दिनांक १ मार्च, १९९३ पासून संस्थेच्या कामकाजास प्रत्यक्ष सुरुवात झाली.

  संस्थेचे कामकाज तिच्या नियामक मंडळाच्या सल्ल्यानुसार चालते. महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री हे संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष आणि शालेय शिक्षणमंत्री, पदसिध्द उपाध्यक्ष असून मंडळावर एकूण २८ अशासकीय सदस्य आणि शासकीय सदस्य कार्यरत आहेत. शासनाच्या 'लॅग्वेज टेक्नॉलॉजी व्हिजन २०१०' या प्रकल्पामध्ये संस्था नियंत्रक म्हणून काम करत आहे. संस्थेचे कार्यालय एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय,३, महानगरपालिका मार्ग, धोबीतलाव, मुंबई ४००००१ येथे आहे.

  विविध क्षेत्रात मराठीचा होणारा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा व मराठी भाषेच्या अभिवृध्दीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतीमान करण्यासाठी भाषा व संस्कृतीच्या क्षेत्रात मराठी भाषेच्या अभिवृध्दीसाठी काम करणाऱ्या विविध शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये समन्वय राखून त्या संस्थांच्या सहाय्याने काही उपक्रम संस्था पार पाडते.

  राज्य मराठी विकास संस्थेची अधिक माहिती http://rmvs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

  मराठी भाषा, साहित्य, इतिहास, सांस्कृतिक व कला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रास लाभलेला वारसा जतन/संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६० मध्ये या मंडळाची स्थापना केली. विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसेच, महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्याविषयीच्या बहुविध वाङ्मय योजनांच्या परिपूर्तीसाठी चालना देणे, मदत करणे तसेच ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधनस्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मुलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथाची भाषांतरे स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देणे हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे.

  मंडळावर शासन निर्णय दिनांक १७ ऑगस्ट, २०१० अन्वये तीन वर्षाच्या कालावधीकरिता अध्यक्ष व ३७ अशासकीय सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या समितीचे अध्यक्ष श्री.मधू मंगेश कर्णिक हे आहेत. संस्थेचे कार्यालय रवींद्र नाटय मंदिर इमारत, दुसरा मजला, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आवार, सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई-४०००२५ येथे आहे.

  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची अधिक माहिती http://mahasahityasanskriti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
  एकूण अभ्यागतांची संख्या : १३५७८३, आजचे अभ्यागत : १
  Valid XHTML 1.0 Transitional Valid CSS!