भाषा संचालनालय

शासनाने राज्य कारभाराची भाषा मराठी राहील असे धोरण दि.1 मे, 1960 रोजी जाहीर केले. मराठी राजभाषा धोरणाचा एक भाग म्हणून शासन निर्णय दि. 6 जुलै, 1960 अन्वये भाषा संचालनालयाची स्थापना करण्यात यावी. मुख्य कार्यालय, प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे असून, संचालनालयाच्या अधिपत्याखाली नवी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद येथे विभागीय कार्यालये आहेत. भाषा संचालनालयामार्फत खालील कामकाज हाताळण्यात येते :-
* राजभाषा मराठी विषयक शासनाचे धोरण राबविणे.
* प्रशासनिक परिभाषा कोश व मार्गदर्शक पुस्तिका तयार करणे.
* अमराठी भाषिक अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी मराठी भाषा परीक्षा आयोजित करणे. केंद्र / राज्य अधिनियमांचा अनुवाद करणे.
* महाराष्ट्र राज्यातील केंद्र शासनाच्या कार्यालयात त्रिभाषा सुत्राचा वापर होतो किंवा नाही हे पाहणे.
* शासन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करण्यासंबंधीच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने शासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे, जिल्हापरिषद कार्यालये यांची तपासणी करणे व त्यांना मार्गदर्शन करणे इत्यादी.
* भाषा संचालनालयाची अधिक माहिती http://bhasha.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
एकूण अभ्यागतांची संख्या : १३५७८३, आजचे अभ्यागत : १
Valid XHTML 1.0 Transitional Valid CSS!