पुरस्कार

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून सन 2012-13 या वर्षापासून खालील पुरस्कार मराठी भाषा विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत-

पुरस्कार

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना :- (या योजनेच्या अधिक माहितीबाबत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळाचा दुवा द्यावा)

     या योजनेअंतर्गत अ) प्रौढ वाङमय विभागात २२ वाङ्मय पुरस्कार ब) बालवाङ्मय विभागात ६ पुरस्कार क) प्रथम प्रकाशन विभागात ६ पुरस्कार व ड) सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार १ असे एकूण ३५ राज्य वाङ्मय पुरस्कार लेखकांना प्रदान करण्यात येतात.

विंदा करंदीकर  जीवन गौरव पुरस्कार

साहित्य  क्षेत्रात उल्लेखनीय  कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास   ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त  स्व.विंदा करंदीकर  यांच्या नांवे जीवन गौरव पुरस्कार  सन २०१० पासून प्रदान करण्यात येतो. सदर पुरस्काराचे स्वरुप रु. ५.०० लक्ष (रुपये पाच लक्ष फक्त)  रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.  या बाबत अधिक माहितीसाठी या विभागाचा शासन निर्णय क्र. पुरस-101५/प्र.क्र.१३३/201५/भाषा-3,                             दि. २२ फेब्रुवारी, २०१६ पहावा. सदर पुरस्कार प्राप्त  पुरस्कारार्थींचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

अ.

क्र

वर्ष

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर

करण्यात आलेल्या साहित्यिकांची नांव

२०१०

श्रीमती विजया राजाध्यक्ष

२०११

श्री.के.ज.पुरोहित

२०१२

श्री.ना.धो.महानोर

२०१३

श्री.वसंत आबाजी डहाके

२०१४

श्री.द.मा.मिरासदार

२०१५

प्रा.रा.ग.जाधव

 

 

 

श्री.पु.भागवत पुरस्कार :

मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्‍या  प्रकाशन  संस्थेस मराठी प्रकाशन व्यवसायात मोलाचे कार्य करणारे श्री.पु.भागवत यांच्या नांवे सन २००8 पासून पुरस्कार प्रदान करण्यात येतो.   या पुरस्काराचे स्वरुप रु.३.०० लक्ष (रुपये तीन लक्ष फक्त) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.  या बाबत अधिक माहितीसाठी या विभागाचा शासन निर्णय क्र. पुरस-101५/ प्र.क्र.१३३/ 201५/भाषा-3,  दि. २२ फेब्रुवारी, २०१६ पहावा. सदर पुरस्कार प्राप्त  पुरस्कारार्थींचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.

क्र

वर्ष

श्री.पु.भागवत पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्या प्रकाशन संस्थेचे नांव

२००८

पॉप्युलर प्रकाशन 

२००९

साकेत प्रकाशन

२०१०

मौज प्रकाशन

२०११

नवचैतन्य प्रकाशन

२०१२

मॅजेस्टिक प्रकाशन

२०१३

राजहंस प्रकाशन

२०१४

श्री.केशव  भिकाजी   ढवळे  प्रकाशन, मुंबई 

२०१५

कॉन्टीनेन्टल प्रकाशन, पुणे 

 

भाषा संवर्धक पुरस्कार

     मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणा-या व्यक्तीस अथवा संस्थेस “भाषा संवर्धन पुरस्कार”  प्रदान करण्याचा निर्णय सन २०१५ पासून घेण्यात आला आहे. त्यानुसार (१) मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व (२) मराठी भाषा संवर्धक पुरस्कार हे दोन पुरस्कार राज्य शासनामार्फत प्रदान करण्यात येतात. या बाबत अधिक माहितीसाठी या विभागाचा शासन निर्णय क्र. भासंपु-2016/प्र.क्र.26/2016/भाषा-3, दि. १८ फेब्रुवारी, २०१६ पहावा.

(१) मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार  :  आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ.अशोक केळकर यांचे नांवे “मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार”  प्रदान करण्यात येतो.  या पुरस्काराचे स्वरुप रु.१,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) रोख,  मानचिन्ह व मानपत्र असे आहे.  सदर पुरस्कार प्राप्त  पुरस्कारार्थींचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

वर्ष

डॉ.अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार

 

२०१५

डॉ. मॅक्सीन बर्नसन, फलटण (सध्या वास्तव्य हैद्राबाद)

 

(२) मराठी भाषा संवर्धक पुरस्कार : कवितेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांवरील आबालवृध्दांपर्यंत सहजसोप्या भाषेत मराठी भाषा संवर्धनाचे लक्षणीय कार्य केलेल्या व्यक्तीस/संस्थेस  कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे नांवे “मराठी भाषा संवर्धक पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रु.१,00,000/- ( रुपये एक लक्ष फक्त ) रोख,  मानचिन्ह व मानपत्र असे आहे.  सदर पुरस्कार प्राप्त  पुरस्कारार्थींचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

वर्ष

कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक  पुरस्कार

 

२०१५

श्रीमती बेबीताई गायकवाड, अहमदनगर

 

एकूण अभ्यागतांची संख्या : १३५७८३, आजचे अभ्यागत : १
Valid XHTML 1.0 Transitional Valid CSS!